आम्हीबिघडलोतुम्हीबिघडा !

Spread the love

आमच्या मैत्रीचं वय विचारू नका! अशी १०-१२ कळप आहेत. ह्यातली काही सोंगायला गेली होती. अनुपस्थित. त्यामुळे हे एवढेच येऊ शकले. हे सगळे एकमेकांचे बालमित्र. सचित्र तारा चौधरी अंकलिपी हे आमच्या काळातलं फार महत्वाचं पुस्तक जे त्याकाळी तोंडपाठ होतं.
हल्ली आपण खुप बिझी आहोत असं दाखविण्याची फॅशन मुर्खाच्या बाजारात आली आहे. त्यामुळे असं भेटण ऐतिहासिक नोंदीची गोष्ट व्हावी असं नाही व्हायला पाहिजे. पुर्वी हाक मारली तर पळत जाऊन भेटत असु. हल्ली हा मारली तर किक मारत भेटायला जावं लागतंय.
यात एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे ‘भेट’! हि भेट ‘ग्रेट’ व्हावी यासाठी एकत्र येण्याचं प्रायोजन. बाकी सारा मनाचा खेळ!!!

१२ वर्षांनंतर आपण सर्व शाळकरी मित्रांनी एकत्र जमावं अशी कल्पना एकाच्या सुपिक डोक्यात खेळली.पुढे त्या निराकार कल्पनेला सत्यात साकारण्यासाठी,तिला आकार देण्यासाठी जी काही कमालीची धमाल गोष्ट घडली ती मुळात गंमतीशीर होती.आपण एकत्र येऊन एखादा विचार ट्रान्सफॉर्म करतो,किंवा त्यात नव्याने value addition करतो त्यावेळेस किती चौकस,जबाबदार रहावं लागतं याचा रोकडा प्रत्यय त्यावेळी आला!!!
आमच्या मैत्रीचा हा आजवरचा टप्पा पोलिओ,बुस्टर डोस ते कोरोना डोस असा असल्यामुळे मैत्रिचे विस्मरण होणं कदापी शक्य नाही.ह्या सगळ्या काळात आपण कितीही बदललो तरीही सलोखा,सद्भावना,सहकार्य यांच्या जोरावरच आपलंपण टिकून राहील असं मला वाटतं.आपण किती फिट,परफेक्ट आहोत यापेक्षाही आपण किती फ्रेंडली आहोत हे जास्त महत्त्वाचे आहे.
आपण आनंदी राहू,अमुक गोष्ट मिळवून,तमूक गोष्ट करून आपण सुख शोधण्यापेक्षा वर्तमानात आनंदी रहायचं कसं,आनंद शोधायचा कसा याच्या साऱ्या शक्यता शोधणं हेच एकत्र येण्याचे प्रयोजन होते……बाकी सारा मनाचा खेळ!!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *