मंगळावर जायचं विसरशील
तू!!! सागरगोटीचा चटका सुरपारंभ्या, लिंगोरच्या, डबाडुब, अंपलचंपल एकसे बढकर एक खेळ हाये राव खेळायला!!! ‘इकोफ्रेंडली खेळ’, ना कुठला पॅक, ना कुठली पावर बँक !!! मंगळावर वस्ती करायची तर कर बाबा… गावाकडची दोन-चार माणस नेता आली तर ने राव तुझ्या त्या मंगळावर…. कपड्यांपासुन दोर बनवतात भारी-भारी बाजा विनतात. न शिकताही त्यांना ‘इकोफ्रेंडली’ जगता येतं. अन् आम्ही शिकलो तर आमच्या कागदी डिगऱ्या आम्ही प्लास्टिकच्या पिशीत लॅमीनेट केल्या!!!
इलॉन एकदा गावाकडे ये तू!!!
