हे सिरियसली घ्या आता !!! मजाक नाही राव खरोखर सिरियसली घ्या. ३,८४,४०० किलोमीटरवर चंद्र आहे. नासाची दोन उपग्रह भारी काम करताहेत तिथं. आपण थोड्या दिवस आपलाच ग्रह नीट सांभाळू ना!!!काय हरकत आहे. ग्लोबल वार्मिंगचा भडका दिवसेंदिवस पेटत असतांना, आम्ही शिकुन हुकलेले माती वाचविण्याच्या काळात मती गहान ठेवून एकमेकांची माथी फोडतोय. शुध्द हवा, पाणी, परिसर तुमची-आमची येत्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे ते का विसरतोय आपण? डेनमार्क देश जे करतोय तेच आपण करु असं म्हणत शुध्द जनविकासाचं राजकारण करता येऊ शकतं ना!!!