पाऊस बोलतोय…. मान्य आहे खुप वाट बघितली. वेळेवर येऊ शकलो नाही. काय करणार क्लायमेट चेंजचा हल्ली मलाही त्रास होतोय. स्वारी मी तुमच्यावर आरोप नाही करणार… तुम्ही केलेले अंदाज चुकू लागलेत हे माझ्याही लक्षात आले आणि मी आज धो-धो पडू लागलीय.
शेवटी मलाही वरून (अपड्राफ्ट्स) प्रेशर आलं की पडाव लागतं. एवढंच की रिमझिम, टिपटिप, धो-धो, संततधार असा काहीसा समन्वय मलाही साधावा लागतो. खरं तर शेतकरी माझा मित्र आहे. कष्टकरी, शेतात राबणाऱ्या माझ्या दोस्ताला मी फारच वाट बघायला लावली. पण आता मनसोक्त आलोय.
आता आलोच आहे तर थोडं थांबून घेतो. थांबून म्हणजे तुमच्या भाषेतला STOP नाही. पडतो असा त्याचा अर्थ! एक-एक गाव घेत, डोंगर दऱ्यांतल्या रानपाखरांना तिथल्या वन्यजीवांनाही भेटतो. तसंच नदी-नाले, विहीरी – बारव, धरणं गाठत पुन्हा समुद्राला भेटतो. तसा मी जात नाही. ओक्के!!!
उत्खनन
chetan_savkar08.