फ्यारेन लव्ली

Spread the love

मुळात आमच्या काळी अर्थात त्याकाळी कृष्णधवल टिव्ही होते.त्यामुळे रंगीबेरंगी, मोहक, गोंडस अथवा आकर्षक अशा गोष्टींचं फारसं दर्शन माध्यमांवर त्याकाळी होत नव्हतं. तरीही फेअर अँड लव्हलीचा ७-८ हजार कोटींचा टर्नओव्हर होत होता. नवल आहे. लपून-छपुन फेअर अँड लव्हली लावणारी पुरुषमंडळी देखील त्या काळी होती. कालांतराने पुरुषजातीसाठी मेन्स अॅक्टीव्ह क्रीम आली आणि पुरुष हा देखील रुपवान असतो याच्या जाहीराती माध्यमांवर झळकु लागल्या. आपल्या परिसरात त्याकाळी तीनही ऋतुमध्ये शेंबडी पोरं फराफरा लोळ्या ओढतांना हमखास दिसायची.आरसा वगैरे भानगडीत पुर्वी कुणी डोकावत नसायचं. त्यामुळे सौंदर्य वगैरे शब्द थोडे महागडे वाटायचे. पुर्वी आपले
आदर्श सिनेमातले टुकार हिरो वगैरे असायचे. असो….पुर्वी हिच ब्युटी इमेज फक्त टिव्हीत बघायची अथवा शोधायची सवय असल्यामुळे विराट, सलमान आपल्याला आवडायचे.कारण आपला भोवताल फारच कुरुप भासे!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *