आमच्यावेळी सायकल फॉर्मला होती. ना कुठलं इंधन, नाही कुठलं प्रदूषण !!! एकवेळ हवा ठासुन भरली अन् चैनीला चांगली ग्रीसींग केली म्हणजे सायकल सुसाट सुटायची. गावात भाड्यानी सायकल देणारं एक दुकान होतं.५रू दिवस बिगरदांडी- बिनमडगार्डची लांडी सायकल !!!
आम्ही मोठे झालो तशे शौक सुध्दा मोठे- मोठे झाले.राकेल पेऊन धुर सोडणाऱ्या गाड्या आमच्या ढुंगणाखाली आल्या अन् प्रतिष्ठेचं माप आम्ही ओलांडलं. जगभर सायकल चालवणारे देश श्रीमंत झाले अन् आम्ही बाटलीत छटाकभर पेट्रोल घेऊन जाळ – धुळ सोडणारे स्टंटमन झालो.
chetan_savkar 08
सायकल
