या शहरांतली गोडाऊनं, कोठारं कुणाच्या कष्टाने भरलेली आहेत? आमच्या घरात येणारं धान्य कुणाच्या कष्टानं
कांमधून खाली उतरवलंय? पायाखालची फरशी, औषधांचे खोके,तेलाचे डबे, सिमेंटच्या, शेतमालाच्या गोण्या, कोविड सेंटरांचे बेड, बांबु, सिलेंडरं कुणी उचलुन वाहिली आहेत ? हिच ती कष्टकरी देवमाणसं ज्यांना ‘हमाल’ म्हणुन आपण त्यांच्या दुःखाची जबाबदारी टाळतो. या शहरात कुठलीही अशी गोष्ट नाही जिला हमालाची पाठ लागलेली नाहीये !!!
या कष्टकरी योध्दांचा १ मे ला सत्कार, आर्थिक मदत करून कौतुक करायला काय हरकत आहे?
*गावागावात युवांनी भाईंचे बर्थडे साजरे करण्यापेक्षा ह्या कष्टकऱ्यांच्या सेवेचा सन्मान करावा.
©chetan_savkar
हमालातला माणुस दिसेल का?
