सुदानमध्ये एक गिधाड भुकेलेल्या लहान मुलीच्या मरणाची वाट पाहत आहे.३३वर्षाचा सा. अफ्रिकेहुन आलेला फोटोग्राफर केविन कार्टर तो फोटो कॅमेरात कैद करतो अन परतीच्या प्रवासाला निघतो.
एकाने केविनला फोनवर विचारले, त्या मुलीचे शेवटी काय झाले? केविन म्हणाला, “मला माहित नाही, मी घाईत होतो आणि मला विमान पकडायचे होते.” समोरच्या व्यक्तीने पुन्हा दुसरा प्रश्न विचारला, “तिथे किती गिधाडे होती? “कार्टर म्हणाला,’मला वाटतं बहुतेक तिथे एकच गिधाड होतं.’ फोनवरील माणसाने कार्टरला अगदी तुच्छतेने सांगितले, “मी तुला सांगतो तिथे एक नाही तर दोन गिधाडं होती. एक फोटोमध्ये असलेले आणि दुसरे कॅमेरामागे असलेलं.” ह्या सर्वाचं स्मरण झाल्यावर कार्टर अस्वस्थ झाला आणि शेवटी त्याने आत्महत्या केली. कार्टर यांचा स्वाभिमान होता म्हणून त्याने आत्महत्या केली.
परंतु आज ३०वर्षानंतर कार्टर उरलेत कुठे संवेदनांप्रती भाव असलेले….!!! आज उरलेत फक्त प्रोफेशनल
गिधाडं…..काही अपवाद वगळता…!!! उत्क्रांत होता होता शेपुट गेली बाकी माकडचाळे नाही!!!
©chetan_savkar
गिधाडगँग



